बीड : काही जण धनंजय मुंडेला नाही, तर ते तुमच्या ताकदीला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात निवडणूक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उभे आहेत. विरोधी पक्षातील नेते उभे आहेत. पण तिकडं नाही, मग परळीचीच चर्चा का? असं म्हणत धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधले आहे..
विधानसभा निवडणूकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार (Dhanajay Munde) धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, की महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात निवडणूक (Sharad Pawar) सुरू आहे.मात्र या २८८ मतदारसंघापैकी कुठल्या मतदारसंघाची चर्चा आहे तर ती परळीची आहे.
तुमच्या ताकदीला संपविण्याचा प्रयत्न
याशिवाय मुंडे म्हणाले, कि धनंजय मुंडे हे नुसते नाव आहे. माझं अस्तित्व काय असेल तर तो तुमचा विश्वास आहे. राजकारणात जर मला अशा पद्धतीने काही करत असतील, तर ते धनंजय मुंडेला नाही तर ते तुमच्या ताकतीला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे म्हणत मुंडेंनी पुन्हा एकदा पवारांवर शरसंधान साधले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.