Beed Parali News Saam tv
महाराष्ट्र

Beed : ऍग्रो मशनरी स्टोअरमधून लांबविल्या इलेक्ट्रिक मोटार; लाखो रुपयांची चोरी उघड, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Beed Parali News : बीड जिल्ह्यातील परळीत तुळजाई ऍग्रो मशनरी स्टोअरमध्ये दोन चोरटयांनी रात्रीच्या वेळी प्रवेश करत साहित्य चोरले आहे. सकाळी हि घटना उघडकीस आली असून लाखोंचा माल लांबविल्याचा अंदाज आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: घरफोडी करण्यासोबत चोरट्यानी आता कंपनीत प्रवेश करत चोरी करण्याचे सुरु केले आहे. थेट गाडी घेऊन येत कंपनीतील माल गाडीत टाकून पसार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशात परळी येथील तेलगाव रोडवर तुळजाई ऍग्रो मशनरी स्टोअरमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणाहून चोरट्यांनी लाखो रुपयांची माल लंपास केला आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी - तेलगाव रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विशाल चव्हाण यांची तुळजाई ऍग्रो मशनरी स्टोअर आहे. या स्टोअरमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. या चोरीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून यामध्ये दोन चोरटे स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसत आहेत. या घटनेत चोरट्यांनी दुकानातून लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले आहे.

इलेक्ट्रिक मोटार, सबमर्सिबल पंप लांबवीले 
तुळजाई ऍग्रो मशनरी स्टोअरमध्ये चोरी झाल्याची घटना २८ जून रोजी पहाटे घडली आहे. दरम्यान दुकानाचे मालक विशाल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी दुकानातील इलेक्ट्रिक मोटार व सबमर्सिबल पंप, बोरवेल असे लाखो रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. 

चोरट्यांचा शोध सुरु 

दरम्यान मशीनरी स्टोअरमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता यात दोन चोरटे दिसून येत आहे. त्यांनी चोरी केलेला माल गाडीत टाकून नेला आहे. त्यानुसार चोरीचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

Paneer Bhurji Recipe : नाश्ता अन् जेवणासाठी झटपट बनवा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

Kendra Yog 2025: उद्यापासून या राशींच्या नशीबाची दारं उघडणार; न्याय देवता शनी बनवणार पॉवरफुल योग

सोमवारी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT