Beed Parali News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed Parali News : बीडच्या परळीत विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला ACB ने रंगेहात पकडले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • परळीत ग्रामसेवक लाच घेताना पकडला

  • ACB चा सापळा यशस्वी

  • विहीर बांधकामाच्या बिलावर सहीसाठी मागणी

  • आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू

Beed Parli Bribe News बीडच्या परळीमध्ये एका लाचखोर ग्रामसेवकाला लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी या ग्रामसेवकाने लाच घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी ग्रामसेवकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, दशरथ देविदासराव गोरे असे या ग्रामसेवकाच नाव आहे. तक्रारदाराच्या विहीर बांधकामाच्या बिलावर सही करून ते मंजूर करण्यासाठी गोरे यांनी एक हजार रुपये मागितले. तडजोडी अंती गोरे यांनी ५०० रुपये तक्रारदाराकडे मागितले. सदर तक्रारदाराने याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली.

ACB ने याची दखल घेत तक्रार दाराची माहिती पडताळण्यासाठी सापळा रचला. या सापळ्यात गोरे अडकले. लाचेची मागणी पंचायत समिती परिसरात करण्यात आली होती. ACB ने दशरथ देविदासराव गोरे यांना ठरल्याप्रमाणे रक्कम स्वतःच्या खासगी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथील पोलीस निरीक्षक कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा समाजाला आरक्षण मनोज जरंगे यांच्यामुळे मिळालं - प्रसाद लाड

Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

Kangana Ranaut Wedding : कंगना रणौतनं गुपचूप लग्न केलं? गळ्यात मंगळसूत्र अन् हातात हिरव्या बांगड्या; 'त्या' फोटोने उडवली खळबळ

वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू; महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक घटना

डायबिटीजवर तगडा उपाय, हे ७ मसाले झटक्यात कमी करतील रक्तातील साखर

SCROLL FOR NEXT