Manasvi Choudhary
मधुमेहाच्या रूग्णांसाठी स्वयंपाकघरातील ७ मसाले गुणकारी ठरणार आहेत. आहारात या मसाल्याचा वापर तुम्ही करू शकता.
हळद ही गुणकारी मानली जाते. हळदीमधील कक्यूमिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
आल्याचा रस शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतो. आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते.
काळी मिरीमध्ये 'पायपेरिन' नावाचा गुणधर्म असतो. जो शरीरातील मेटाबॉलिझम वेगवान करते आणि इन्सुलिनचा स्राव वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतो.
लसूण केवळ साखरच नियंत्रित ठेवत नाही, तर मधुमेहामुळे होणाऱ्या हृदयविकाराचा धोकाही कमी करतो.
मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर रक्तातील कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण कमी करते.
लवंग शरीरात इन्सुलिनसारखेच काम करते. लवंग पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
दालचिनी शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव वाढवून रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करते.