Women Group Farming Saam tv
महाराष्ट्र

Women Group Farming : महिलांची गट शेतीतून क्रांती; ट्रॅक्टरने सगळी कामे करतात महिला, बीडच्या देवळा गावचा आदर्श

Beed News : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावच्या ११ महिलांनी एकत्र येत ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून त्या एकमेकींच्या शेतीत सांगड पद्धतीने काम करत आहेत

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावातील महिलांनी शेती क्षेत्रात एक अनोखी क्रांती घडवून आणली आहे. या गावातील ११ कुटुंबातील महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली. त्या शेतीतील सर्व कामे स्वतः करू लागल्या. बीज प्रक्रिया ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्या प्राविण्य मिळवलेल्या आहेत. ट्रॅक्टर फवारणी यासारख्या विविध कामांमध्ये त्या एकमेकाला मदत करतात.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावच्या ११ महिलांनी एकत्र येत ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून त्या एकमेकींच्या शेतीत सांगड पद्धतीने काम करत आहेत. नांगरणी, पेरणी, खुरपणीसह आदी कामे सांगड पध्दतीने करत असल्याने त्यांच्या पैश्याची देखील बचत होत आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालवण्यापासून सर्व कामे या महिला करतात.

कृषी विज्ञान केंद्र, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाकडून या महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. याबाबत योगिता खामकर सांगतात की मी शेतामध्ये खूप काम करायचे, मात्र माझे पती त्या कामाबद्दल अभिमान बाळगत नसत. मात्र मी गट शेतीच्या महिलांसोबत आल्यास माझं मन मोकळं झालं आणि मला सन्मान मिळू लागला.

सशक्तीकरणाच्या दिशेने पाऊल 
महिलांचे एकीकरण समाजातील इतर महिलांना निश्चित प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाने इतर गावातील महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे गावातील महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. गटाच्या महिला बैठकीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वांच्या सुख दुःखात देखील सामील होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या क्षणी गेम चेंज; 'Bigg Boss 19'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, नवा कॅप्टन कोण?

Maharashtra Dasara Melava Live Update : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना

Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Amravati : ताट वाटी वाजवत व चिल्लर तहसीलदारांच्या टेबलवर टाकून सरकारचा निषेध; तुटपुंजी मदतीच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक

Maharashtra: भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर, तर पुणेकर राज्यात अव्वल, धक्कादायक आकडेवारी

SCROLL FOR NEXT