Beed News Saam tv
महाराष्ट्र

मला प्रभारी मुख्यमंत्री करा; बीडच्या तरुणाची राज्यपालांकडे अनोखी मागणी

प्रभारी मुख्यमंत्री पदी नियुक्त करा; बीडच्या युवकाची राज्यपालांकडे अनोखी मागणी

विनोद जिरे

बीड : सध्या राज्यभरात सत्तेचे महानाट्य चालू असून आता सरकार नेमके कोणाचे येणार? नेमकं काय होणार? कशी सत्तापालट होणार? याकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशभराचे लक्ष लागलेले आहे. मात्र बीडच्या (Beed) एका युवकाने चक्क राज्यपाल यांना निवेदनामध्ये सध्याचा प्रभारी मुख्यमंत्री मला बनवा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदनाद्वारे केली आहे. (beed news Unique demand of young man to the Governor)

महाराष्ट्र सरकारमधील सुरू असलेल्या राजकीय नाट्याकडे राज्याचे नव्हे; तर देशभराचे लक्ष लागलेले आहे. तर आता दुसरीकडे बीडमधील श्रीकांत गदळे नावाच्या तरुणाने मला महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करा. अशी राज्यपालांकडे मागणी केली आहे. गदळे यांनी याअगोदर देखील एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत त्या आशयाचे निवेदन त्यांनी राज्यपालांना पाठवले होते.

राजकीय पक्षांचा निर्णय लागेपर्यंत हवेय पद

सध्या शेतकाऱ्यांपुढे (Farmer) पुन्हा एकदा संकट ओढवण्याची शक्यता आहे. अनेक भागात पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्याचबरोबर पावसाळा (Rain) सुरू झाला असून, राज्यात अनेक भागात पाऊस झाला तर पुरस्थिती येऊ शकते. त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जोपर्यंत वरच्या राजकीय पक्षांचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत मला राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करावे; अशी मागणी बीडच्या श्रीकांत गदळे या तरुणाने राज्यपालांकडे केली आहे. एकीकडे राज्यात राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असतांना बीडमधील तरुणाने केलेल्या अनोख्या मागणीने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT