Beed- Parli Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Beed Accident: मन सुन्न करणारी घटना! भरधाव ट्रकची स्कूटीला धडक; वडिलांच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू

Beed- Parli Highway Accident: बीड -परळी महामार्गावरील (Beed- Parli Mahamarg) वडवणी शहराजवळ ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

विनोद जिरे

Beed Accident News:

बीडमधून (Beed) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीड -परळी महामार्गावर स्कूटीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वाती शिवनारायण गोंडे ही तरुणी वडील शिवनारायण गोंडे यांच्यासोबत काही कामानिमित्त वडवणी (Vadvani) शहरात आले होते. काम आटोपून दोघेही आपल्या स्कूटीवरुन चिंचोली (Chincholi) गावाकडे घरी जायला निघाले.

यावेळी बीड -परळी महामार्गावरील (Beed- Parli Mahamarg) वडवणी शहराजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत स्वाती शिवनारायण गोंडे या २१ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला तर वडील शिवनारायण गोंडे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा करुण अंत झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT