Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : खेळता-खेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले; एकाच कुटुंबातील तिघेही बुडाले, हृदयद्रावक घटना

Drown In Farm Lake: शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Sawleshwar Paithan News: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या पैठण सावळेश्वर गावात मंगळवारी (२१ मार्च) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वराज जयराम चौधरी (वय ९ वर्षे ), पार्थ श्रीराम चौधरी (वय ७ वर्षे ) आणि कानिफनाथ गणेश चौधरी (वय ७ वर्ष ) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने बीड जिल्ह्यातील गावांवर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळाकडे युसुफवडगाव पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुलांच्या आई ज्वारी काढण्यासाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा दुपारी तिघांनाही शेतातल्या झाडाखाली थांबायला सांगितलं होतं. जवळच शेततळे असल्याने तिन्ही मुले खेळत-खेळत शेततळ्यावर गेली. यातील एका मुलाला पाण्याचा मोह न आवरल्याने तो शेततळ्यात उतरला. दरम्यान, पोहता येत नसल्याने बुडू लागला.

त्याला वाचवण्याचा नादात इतर दोन मुलेही पाण्यात उतरली. त्यांनाही पोहता येत नसल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी हजर झाले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान त्या तिघांही अल्पवयीन भावावर एकत्र अंत्यविधी करण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT