Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: दारू पिण्यासाठी मोटारसायकलींची चोरी; दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

Beed News : दारू पिण्यासाठी मोटारसायकलींची चोरी; दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

विनोद जिरे

बीड : मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दुचाकी चोरणाऱ्या (Beed) या टोळीला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. ५ आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून (Beed Police) तब्बल १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

बीड शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. पोलीस त्यांच्या मागावर असताना चोरी (Bike Theft) करणारी टोळी पोराच्या हाती लागली आहे. सद्दाम मुसा शेख (रा. बागवान गल्ली, केज), अमोल रामचंद्र कुरूंद (रा. वानगाव फाटा), ख्वाजामिया नवाब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज), अशोक फुलचंद शिंदे व किरण अरुण पिसुरे (दोघे रा. जानेगाव, ता. केज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दारू पिण्यासाठी चोरी 

हे आरोपी दारू पिण्यासाठी मोटरसायकल चोरत होते. मोटारसायकल चोरून विक्री करणाऱ्या या टोळीने संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT