Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: भरधाव टेम्पोने बांधकाम कामगारांना चिरडले; दोन जण जागीच ठार

भरधाव टेम्पोने बांधकाम कामगारांना चिरडले; दोन जण जागीच ठार

विनोद जिरे

बीड : भरधाव वेगात असलेल्‍या टेम्पोने दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या बांधकाम कामगारांना चिरडले. या भीषण अपघातात (Accident) बांधकाम मिस्त्रीसह एक कामगार महिलेचा जागीच मृत्‍यू झाला आहे. अपघाताची घटना (Beed) बीड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी तीनच्‍या सुमारास घडली. (Letest Marathi News)

सदर अपघातात अनिता भारत सरपते (वय 41, रा. गोविंदनगर, बीड) व कालिदास विठ्ठल जाधव (वय 38, रा. शेलगाव गांजी ता. केज) अशी मयतांची (Accident Death) नावे आहेत. अनिता सरपते या बिगारी काम करत होत्‍या, तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते. ते दोघे बांधकामावर कामासाठी दुचाकीवरून मांजरसुंबाकडे जात होते. यादरम्यान गेवराईकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने त्यांना चिरडले.

दुचाकीचा चक्‍काचूर

दरम्यान, अनिता सरपते यांचा मृतदेह टेम्पोखाली अडकला होता. अखेर क्रेनच्‍या सहाय्याने तो बाहेर काढला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर अनिता सरपते यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Labour Law: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता कर्मचारी कपातीसाठी परवानगीची गरज नाही

Maharashtra News Live Update : मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, केमिकल कंपनीतील गॅस लिकेज, १७ जणांना त्रास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Crime : कुर्ल्यात गोळीबाराचा थरार, गुंड बाबा याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या

SCROLL FOR NEXT