Farmer
Farmer Saam tv

Farmer: कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
Published on

औरंगाबाद : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. सदर प्रकार (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील चारनेवाडी येथे घडला आहे. (Live Marathi News)

विजयसिंग चैनसिंग गोठवाल यांनी घरात कुणी नसतांना विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकरी (Farmer) विजयसिंग गोठवाल यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक (Bank) आणि खाजगी बँकांचे कर्ज होते. यामुळे कर्ज कसे फेडावे? या विंवेचनेत विजयसिंग गोठवाल होते. यातूनच त्‍यांनी आत्‍महत्‍येचे पाऊल उचलले.

Farmer
Crime News: मध्यरात्री घरी आला, बिर्याणी खाल्ली; २ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला

अस्‍मानी संकंटाने उत्‍पन्‍न मिळेना

गोठवाल यांची शेती डोंगराळ भागात असल्याने तेथे फारसे उत्‍पन्‍न येत नव्‍हते. यातच सततच्या अस्मानी संकटांनी शेतीचे जास्त उत्पन्न मिळत नव्‍हते. यात डोक्‍यावर कर्जाचा डोगर असल्‍याने कर्ज फेडावे कसे; याच विचारात ते रहात होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, २ मुली, मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com