Beed News shivshahi bus got fire after tire busted in parli City Saam TV
महाराष्ट्र

Shivshahi Bus Fire: बीडमध्ये धावत्या शिवशाही बसला भीषण आग; संपूर्ण बस जळून खाक, थरारक घटना

Beed Shivshahi Bus Fire: लातूरहून प्रवाशी घेऊन परळी मार्गे परभणीकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली.

विनोद जिरे

Beed Shivshahi Bus Fire

बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरहून प्रवाशी घेऊन परळी मार्गे परभणीकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचं कळताच चालकाने सतर्कता दाखवत बस थांबवली. (Latest Marathi News)

बसमधील प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आलं. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. हा थरारक प्रकार परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

सुदैवाने बस वाहक व चालकाने गाडी वेळीच थांबवली. बसमधील २० प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT