Beed Shirur Police Station News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: ५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी रंगेहाथ पकडला; बीडमधील खळबळजनक घटना

Beed Shirur Police Station News: शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत.

विनोद जिरे

Beed Crime News: बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या लाचखोरीत विशेषत:पोलिस दल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. काल-परवाच वडवणी येथील एका पोलिस कर्मचाऱ्यास लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली होती. आता गुरूवारी शिरूर (Beed News) पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत.

अदखलपात्र गुन्हात मदत करण्यासाठी 5 हजार स्वीकारताना शिरूर पोलीस (Police) ठाण्यातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. शिवाजी श्रीराम सानप (वय 41) असं लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवाजी सानप यांनी तक्रारदाराकडून अदखपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची मागणी केली होती.

तडजोडी अंती 5 हजारात तडजोड झाली. दरम्यान तक्रारदाराची मुळीच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने ही माहिती लाचलुचपत पथकाला दिली. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून सानप यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. सानप यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT