Darshana Pawar Case: दर्शना पवारसोबत नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनेचा होणार उलगडा; राहुल हंडोरेला पोलीस कोठडी

Darshana Pawar Murder Case Updates: दर्शना पवार हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.
Darshana Pawar Murder Case Updates
Darshana Pawar Murder Case UpdatesSaam TV
Published On

Darshana Pawar Death Case Latest Updates: दर्शना पवार हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता आरोपी राहुल हंडोरे येत्या २९ दिवसांपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. राहुलने दर्शनाची हत्या का केली? यामागचं कारण नेमकं काय होतं? याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

Darshana Pawar Murder Case Updates
Pune Crime: मामाच्या मुलीसोबत लग्न, १० वर्षांचा सुखी संसार; शांत स्वभावाच्या डॉक्टरने अख्खं कुटुंब का संपवलं?

एमपीएससी परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकावर उतीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते. दर्शना मूळची नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती.

दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात (Pune news) एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. तिथेच राहुल याने तिची हत्या केली. हत्येनंतर तो पसार झाला होता.

Darshana Pawar Murder Case Updates
Darshana Pawar News: राहुल दर्शनाचा नातेवाईक होता का? दोघांमध्ये कधीपासून ओळख? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

दरम्यान, गुरूवारी  पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने राहुल हंडोरे याला २९ जूनपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता आरोपी राहुलने दर्शनाची हत्या का? आणि कशी केली? याचं लवकरच गुढ उलगडण्याची शक्यता आहे.

दर्शनाची हत्या करणारा राहुल हंडोरे कोण आहे?

दर्शना पवार हिची हत्या करणारा आरोपी राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा रहिवाशी आहे. त्याने BSC पर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. राहुल हा पुण्यात MPSC ची तयारी करत होता. मागच्या अनेक वर्षांपासून राहुल बाहेरगावी शिकत असल्याने गावात त्याच्याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र राहुल याचे कुटुंबीय गावात राहत असल्याने सुट्ट्यांसाठी राहुल शाह गावात यायचा त्यामुळे मोजकीच लोकं त्याला ओळखत होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com