Beed Husband Hunger Strike Saam Tv
महाराष्ट्र

Beed Hunger Strike: बायको गेली माहेरी नवरा बसला खंडोबा दारी; राज्यभरात सेलू गावातील उपोषणाची चर्चा

Beed Husband Hunger Strike: बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याचे खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू केले आहे. बीडच्या सेलू गावात उपोषण सुरू असून याची चर्चा होत आहे.

Bharat Jadhav

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

आतापर्यंत आपण नवरा-बायकोतील वाद पोलीस ठाण्यात, कोर्टात गेलेला पाहिला असेल. मात्र बीडच्या सेलू गावात बायकोसाठी नवऱ्याने थेट खंडोबा मंदिराचा पायथा धरत आमरण उपोषण सुरू केले आहे. बायको नांदण्यास येत नसल्याने एका व्यक्तीने उपोषण सुरू केलंय. बीडच्या गेवराई तालुक्यातील सेलू गावात आमरण उपोषण सुरू आहे. तातेराव अभिमान बहिरे रा.सेलू ता गेवराई असे उपोषण करणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.

तातेराव यांचा विवाह २००२ साली बीडच्या दिंद्रुड येथील हंगरगे कुटुंबीयातील लक्ष्मी हिच्याशी झालाय. त्यांना १ मुलगा अन् ४ मुली असे अपत्य आहेत. तातेराव यांनी एका मुलीचे लग्न ही करून दिले. मात्र,मागील अडीच महिन्यांपासून पत्नी ३ मुली व एका मुलासह माहेरी गेलीय. पत्नी येत नसल्याने, जेवणाची सोय लागत नसल्याने, तातेराव यांनी पत्नीला नांदण्यास पाठवावे. अशी तक्रार बीडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे..

तर या तक्रारीची दखल न घेतल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून तातेराव बहिरे यांनी सेलू गावातील खंडोबाच्या मंदिरात आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान या तात्याराव बहिरे यांच्या आमरण उपोषणाची आता बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल न घेतलेल्या तात्याराव बहिरे यांचे उपोषण सोडण्यासाठी, बायको येणार का ? अशी देखील चर्चा बीडमध्ये रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT