Sant Muktai Palkhi Saam tv
महाराष्ट्र

Sant Muktai Palkhi : संत मुक्ताई पालखी आजोळमध्ये दाखल; बीडमध्ये आजोबा गोविंद पंत आणि नातीची होणार भेट

Beed News : दरवर्षी परंपरेनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असतात. यात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकाराम महाराज व मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताई पालखी निघत असते

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. यात मुक्ताईनगर येथून निघालेली आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे आज बीड शहरात आगमन झाले असून बीडकरांनी मोठ्या उत्साहात पालखीच स्वागत केलं. बीड हे संत मुक्ताईंचे आजोळ असल्याने परंपरेप्रमाणे संत मुक्ताईची पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यानंतर पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. 

आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळावा भरत असतो. आषाढी वारीची वर्षभर वारकरी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. आता आषाढी एकादशी पंधरा दिवसांवर असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. तर दरवर्षी परंपरेनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असतात. यात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकाराम महाराज व मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताई पालखी निघत असते. 

बीडमध्ये आजोबा- नातीची भेट 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथून निघणारी संत मुक्ताई पालखी ६ जूनला पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. आज या पालखीचे बीडमध्ये आगमन झाले असून बीड येथे संत मुक्ताबाई यांचे आजोळ असल्याने या ठिकाणी आजोबा आणि नातीची भेट होत असते. यामुळे पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी राहत असते.  

भाविकांनी घेतले दर्शन 

दरम्यान बीड शहरात पालखीचे आगमन झाल्यानंतर ढोल ताशांचे पथक रांगोळ्यांच्या पायघड्या असं उत्साहात मुक्ताई पालखीचे स्वागत स्वागत करण्यात आले. दरम्यान यावेळी बीडकरांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आता पुढील दोन दिवस पालखी बीडमध्ये मुक्कामी राहणार असून येथे आजोबा आणि नातीची भेट घडविली जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT