Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : 'आरटीओ'च्या नावाने एजंटाने घेतले ८ हजार; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Beed News : आरटीओ कार्यालयात ६०० रुपयांत होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने १० हजार रुपये मागितले. त्यातील ८ हजार रुपये घेताना एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Rajesh Sonwane

योगेश काशिद
बीड
: आरटीओ कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट कायम पाहण्यास मिळत असतो. येथील प्रत्येक काम एजंट मार्फत केले जात असल्याचा अनुभव येतो. मात्र याचा फायदा काही एजंट घेत असतात. त्यानुसार बीडच्या आरटीओ कार्यालयात चक्क आरटीओच्या नावाने एजंटने ८ हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत एजंटला ताब्यात घेतले आहे. 

आरटीओ कार्यालयात ६०० रुपयांत होणाऱ्या कामांसाठी बीडच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने एजंटाने १० हजार रुपये मागितले. त्यातील ८ हजार रुपये घेताना एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बीड शहरातील बशीरगंज चौकात करण्यात आली. अब्दुल रहीम अब्दुल मजीद असे पकडलेल्या एजंटाचे नाव आहे. दरम्यान, पकडल्यानंतर एजंटाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

तडजोडीअंती ठरले ८ हजार 
आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रंजित पाटील यांच्या नावाने १० हजार रुपयांची लाच मागणी केली. मात्र तक्रादाराने केलेल्या तडजोडीत ८ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्यात ८ हजार रुपये घेण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला होता. एसीबीने ही लाच घेताना एजंटला बशिरगंज चौकात रंगेहात पकडले.

स्वेच्छानिवृत्ती मंजुर करण्यासाठी दीड लाखाची लाच 
तुळजापूर
: स्वेच्छानिवृत्ती मंजुर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्विकारताना तुळजापूर येथील राबसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालयाचे सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठे पाटील हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. तक्रारदार शिक्षक हे ५७ वर्षीय असुन ते रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मंजुर करुन घेण्यासाठी अर्ज केला होता. हा ठराव घेण्यासाठी सचिव पेठेपाटील यांनी दीड लाखाची मागणी केली होती. त्यानुसार लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

SCROLL FOR NEXT