Beed Ashti Taluka Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : बीडच्या आष्टी तालुक्यात मध्यरात्री दरोडा; 11 जणांवर जीवघेणा हल्ला, दीड महिन्यांच्या बाळालाही सोडलं नाही

Beed Ashti Taluka Crime News : बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ गावातल्या भागवत वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखांनी 11 जणांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला.

विनोद जिरे

बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ गावातल्या भागवत वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखांनी 11 जणांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. संतापजनक बाब म्हणजे, यावेळी दीड महिन्यांच्या बाळाला देखील जमिनीवर आपटून मारहाण करण्यात आली. यात भागवत कुटुंबातील 9 व्यक्ती आणि 3 बालक गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Beed News) केरूळ गावात भागवत वस्ती आहे. या वस्तीवर भागवत कुटुंबीय राहतात.

मंगळवारी रात्री ते घरात झोपले असताना अचानक अज्ञात 10 ते 12 दरोडेखोर आले. त्यांनी कुटुंबातील सर्व व्यक्तींना मारहाण (Crime News) केली. इतकंच नाही तर घरातील महिला आणि दीड महिन्यांच्या बाळाला ओलीस धरून दागिने, सोने आणि पैसे कुठे ठेवलेय सांगा, असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

भागवत कुटुंबियांनी याला प्रतिकार केला असता, दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत कुटुंबातील अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, दरोडेखोर घरातील सोने-चांदीचे दागिने आणि मुद्देमाल घेऊन फरार झाले आहेत.

स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भागवत वस्तीवर धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या हल्यामुळे भागवत कुटुंब भयभित झाले आहेत. जखमी व्यक्तींनी साम टीव्हीला सांगितलेली आपबीती अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makyachi Bhakri Recipe : जेवणासाठी खास बनवा मऊ अन् पौष्टिक मक्याची भाकरी, वाचा गावरान रेसिपी

Parenting Tips: मुलांसमोर कधीही करू नका या चुका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: बीडच्या नारायण गड येथील दसरा मेळाव्याचे बॅनर

Actor Death Mystery : कॉल बॉयशी शरीरसंबंध, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.. नंतर जमिनीत आढळला अभिनेत्याचा मृतदेह

Kidney Damage: किडनी निकामी झाल्यास पायांमध्ये दिसतात 'ही' लक्षणं

SCROLL FOR NEXT