ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किडनीचे विकार असल्यास शरीर आपल्याला काही संकेत देतं असतं, त्याला वेळीच ओळखणे गरजेचे असते. किडनी निकामी झाल्यास पायांमध्ये कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
किडनी योग्यरित्या काम करत नसल्यास पायाला सूज येते. ही सूज पाणी किंवा मीठ जमा झाल्यामुळे येते.
किडनीच्या समस्येमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यास सुरुवात होतात ज्यामुळे त्वचेवर चट्टे येऊ शकतात.
शरीरातील रक्त किंवा फ्लूइडचा संतुलन बिघडल्यामुळे पाय जड वाटू शकतात. तसेच सतत थकवा जाणवू शकतो.
पायाची त्वचा पिवळी पडणे किंवा ड्राय होणे तसेच खाज सुटणे हे देखील किडनी डॅमेज झाल्याचे लक्षण आहे.
स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.
जर पायांना सतत सूज येत असेल किंवा पाय दुखण्याची समस्या असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.