ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघ दुबईला पोहोचला आहे. दुबईला पोहोचताच टीम इंडियाच्या या सराव सत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे ऑलराउंडर हार्दिक पंड्या.
या वेळी त्याच्या नवीन लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले. हार्दिकच्या हेअरस्टाईलची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु या वेळी त्याच्या हेअरस्टाईलपेक्षाही जास्त चर्चा रंगली ती म्हणजे त्याच्या घड्याळाची.
हार्दिकने इंस्टाग्रामवर सरावाचे फोटो शेअर केले. त्याच्या कॅप्शनमध्ये बॅक टू बिझनेस असे लिहिलेले होते. त्याच पोस्टमध्ये जगातील सर्वात महागड्या घड्याळांपैकी एक असलेले रिचर्ड मिल हे घड्याळ त्याच्या हातात दिसले. हार्दिक पंड्याने Richard Millie RM 27-04 घड्याळ घातले होते.या घड्याळाची किंमत २० कोटी रुपये आहे.
फर्स्ट क्लास टाइमपीस वेबसाइटनुसार, या घड्याळाची किंमत २,२५,०००० डॉलर्स इतकी आहे. तर आशिया कपची प्राइज मनी २.६ कोटी रुपये इतकी आहे. आशिया कपच्या प्राइज मनीच्या तुलनेत घड्याळाची किंमत ८ पट जास्त आहे.
हार्दिक पंड्याने घातलेले घड्याळ जगभरात फक्त ५० लोकांकडे आहे. हे घड्याळ खास महान टेनिसपटू राफेल नदालसाठी बनवण्यात आले होते.
घड्याळाच्या स्ट्रॅपसह याचे वजन ३० ग्रॅम आहे. यामध्ये ०.२७ mm पातळ स्टील केबल आहे. पट्ट्यासह त्याचे वजन फक्त ३० ग्रॅम आहे, परंतु ते १२,००० ग्रॅमपेक्षा जास्त फोर्सचा सामना करू शकते.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ दुबईमध्ये खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० सप्टेंबरला पहिला सामना यूएईचा विरुद्ध खेळणार आहे.