ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनहेल्दी जीवनशैलीमुळे, आजकाल लोकांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची समस्या वाढत आहे.
जर तुम्हाला कारण नसताना वारंवार थकवा जाणवत असेल तर ते सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
सायलेंट हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. यामुळे चालताना किंवा विश्रांती घेताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
रात्री श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अस्वस्थता वाटणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. म्हणून, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांना पोटदुखी किंवा अॅसिडिटी जाणवते, पण त्यांना बऱ्याचदा वाटते की ते गॅस आहे, पण हे हृदयाशी संबधित समस्या देखील असू शकते.
जर तुम्हाला अचानक कोणतेही काम न करता घाम येत असेल तर हे हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
सतत चक्कर येणे किंवा डोक्यात जडपणा जाणवणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.