Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ठाकरे गटाला बीडमध्ये खिंडार; युवा सेना प्रमुख व महिला आघाडी जिल्हाध्यक्षांनी ठोकला रामराम, VIDEO

Beed News : बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख रविराज बडे व गजानन कदम आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता चव्हाण यांनी शिवसेना उबाठा गटाला रामराम ठोकत

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत दोन युवासेना जिल्हा प्रमुख व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 

बीड (Beed) जिल्ह्यातील ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख रविराज बडे व गजानन कदम आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता चव्हाण यांनी शिवसेना (Shiv Sena) उबाठा गटाला रामराम ठोकत हजारो शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. जवळपास ४०० गाड्यांचा ताफा घेऊन आज हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून आज हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडणार आहे.सुषमा अंधारेंवर केले आरोप 

दरम्यान ज्या स्वतःला नेत्या समजतात. त्या शिवसेनेच्या उपनेत्या. ज्यांनी रश्मीताईंना साडी घेण्यासाठी जिल्हा प्रमुखांकडून पैसे घेतले. याचा पुरावा माझ्याकडे आहे; अशा सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) कामाला कंटाळून आम्ही अंधारे सेनेला रामराम ठोकत आहेत; असा गंभीर आरोप या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाची जिल्ह्यात प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन जणांनी पक्ष सोडल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

Maharashtra Live News Update: भाजपने एमआयएमबरोबर युती केली, हिंदुत्वाचं काय? - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT