Ahmednagar- Parali Railway Line Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar- Parali Railway Line : नगर- परळी रेल्वे मार्गासाठी २७५ कोटींची तरतूद; १२८ किलोमीटरचे काम बाकी

Beed News : केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला १५ हजार ५५४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्ग निर्माण केले जाणार आहेत.

विनोद जिरे

बीड : नगर- बीड- परळी या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Beed) आता एवढेच पैसे राज्य सरकार देखील देणार असल्याने या (Railway) रेल्वे मार्गासाठी जवळपास ५५० कोटी येणार असल्याने रेल्वे मार्गाचे काम गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला १५ हजार ५५४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्ग निर्माण केले जाणार आहेत. त्यात अहमदनगर- बीड- परळी या (Parali) रेल्वे मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Ahmednagar) नगर व बीड या दोन जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेमार्ग फायद्याचा ठरणार आहे. परंतु आता हे काम जलदगतीने व्हावे; अशी अपेक्षा केली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१२८ किमीचे काम बाकी 

सदरच्या रेल्वेमार्गाचे आतापर्यंत १३३ किलोमीटरचे काम झाले असून १२८ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. मुख्य म्हणजे १३३ किमीच्या कामासाठी तब्बल २२ वर्षे लागले. आता उर्वरित १२८ किलोमीटरसाठी आणखी किती वर्षे लागणार? असा प्रश्न आता बीडकरांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत रेल्वे मार्गाचे स्वप्न २०२४ मध्ये पूर्ण होईल; असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ते आता हवेतच विरल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT