Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : दूध दरवाढीसाठी बीडमध्ये लक्षवेधी आंदोलन; आंदोलकांनी मसाला दुधाचे केले वाटप

Beed News : दूध दर वाढीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. मात्र सरकारकडून अद्याप काही निर्णय झाला नसल्याने बीडमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले

विनोद जिरे

बीड : दुधाचे दर घसरले असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीडमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. यात (Beed) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांना मसाला (Milk) दुधाचे वाटप करून हे आंदोलन करण्यात आले. (Breaking Marathi News)

यंदा पावसाळा कमी झाल्याने पिकांचे चांगले उत्पादन नाही. शिवाय जनावरांच्या चाऱ्याची देखील टंचाई जाणवत आहे. चारा महाग असल्याने तो घेणे परवडत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी जनावरे विक्री केले आहेत. पशुधनाचे पालन करताना (Farmer) शेतकऱ्यांना बराच खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत दुधाला भाव नसल्याने शेतकर्यांसमोर संकट उभे आहे. दूध दर (Milk Price) वाढीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. मात्र सरकारकडून अद्याप काही निर्णय झाला नसल्याने बीडमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकीकडे चारा आणि जनावरांसाठीच्या खुराकाचे दर वाढले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पशुधनाची खरेदी केली. त्याच्या कर्जाचे व्याज शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून आधीच दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. यावर शासनाने तत्काळ उपाय योजना करावी व दुधाला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT