Manasvi Choudhary
दुध हे रोजच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दुधाचे सेवन करतात.
दुधामध्ये जीवनसत्व, खनिज पदार्थ असल्याने दुधाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.
दुधामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात.
आयुर्वेदानुसार, दुधासोबत काही पदार्थाचे सेवन करू नये.
दुध प्यायल्यानंतर लगेचच फणस खाऊ नये ज्यामुळे त्वचेच्या समस्या होतात.
दुध प्यायल्यानंतर मासे खाऊ नयेत. किंवा मासे खाल्ल्यानंतर दुध प्यायल्यास पचन तसेच अन्नातून विषबाधा होते.
दुध आणि दही एकत्र खाऊ नये पचनसंस्थेवर परिणाम होतो.
उडीद डाळ आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते तसेच मळमळ आणि उलट्या होतात.
उडीद डाळ खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनी दूध प्यावे.