Beed News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Beed News : बीडच्या आष्टी मतदार संघामध्ये भाजपकडून सुरेश धस, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे, महाविकास आघाडीकडून महेबूब शेख तर अपक्ष म्हणून भीमराव धोंडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आता बीडच्या आष्टीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोस्टल मतदान करण्यामध्ये भाजपच्या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून दबावतंत्र केल जात असल्याचा आरोप होत आहे. मतदान केंद्राच्या परिसरात गाड्या लावून, चिन्ह दाखवून मतदान करायला सांगितलं जात असल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे ज्या मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा बॅलेट पेपर देखील समोर आला आहे. या बॅलेट पेपरवर भाजपच्या सुरेश धस यांना मतदान केल्याचं दिसत आहे. हे सर्व धक्कादायक पुरावे घेऊन राम खाडे यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे. 

बीडच्या (Beed News) आष्टी मतदार संघामध्ये भाजपकडून सुरेश धस, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे, महाविकास आघाडीकडून महेबूब शेख तर अपक्ष म्हणून भीमराव धोंडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र सध्या प्रचार सुरू असतानाच या पोस्टल मतदानामधील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रार झाल्याने आता निवडणूक विभाग यावर काय कारवाई करणार? याकडे (BJP) सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तक्रारींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
दरम्यान राम खाडे यांनी सांगितले, कि आष्टीमध्ये या मतदान प्रक्रियेत बोगसपणा व दबावतंत्र सुरू असल्याचे वेळोवेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह निवडणूक विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यांनी टाळाटाळ केलं. याला कारण म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे गेल्या २५ वर्षापासून बीड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथील उमेदवार आणि त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे माझी निवडणूक विभागाला एकच विनंती आहे, की हे जे मतदान झालं आहे, ते पूर्णपणे रद्द कराव आणि पुन्हा मत प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा मी याला कोर्टात चॅलेंज करेल. असा इशारा यावेळी तक्रारदार राम खाडे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीच्या वेळी महिलांमध्ये सेक्सची इच्छा का वाढते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Skin Care Tips: पिंपल फोडल्याने काय होतं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update :जागतिक पारायण दिनाच्या निमित्याने वर्ध्यात गजानन महाराज भक्तांची मांदियाळी

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं निलंबन; अमरावतीमधील राजकारणात मोठी खळबळ

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

SCROLL FOR NEXT