Beed News
Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: खाडाखोड करुन दहावी नापासचा झाला पास; नोकरीही मिळवली, ४ वर्षानंतर उघडकीस आला प्रकार

विनोद जिरे

बीड : दहावीच्या परिक्षेत नापास असतानाही गुणपत्रिकेत खाडाखोड करुन पास असल्याचे दाखविले. इतकेच नाही तर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bajar Samiti) भरती प्रक्रियेत सहभागी होत वाहन चालकाची नोकरी मिळवल्याचा प्रकार ४ वर्षानंतर समोर आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

बीड (Beed) कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१८ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. यामध्ये शेख रिजवान शेख गफ्फार याने वाहन चालक पदासाठी अर्ज केला होता. किमान दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रतेची अट होती. मात्र रिजवान हा दहावी नापास होता. त्याने भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड करुन दहावी पास असल्याचे दाखवून (Fraud) वाहनचालक पदासाठी अर्ज केला.

तक्रारीनंतर झाला उलगडा

वाहन चालक म्हणून त्याची निवडही झाली. मात्र, त्यानंतर काही दिवसांची याबाबत तक्रार केली गेली. यानंतर चौकशी करण्यात आली. यात, रिजवान याचे गुणपत्रक चूकीचे असल्याचे व तो नापास असतानाही त्याने पास म्हणून दाखवत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

SCROLL FOR NEXT