Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या बॅनर विरोधात धडक कारवाई; परळी पालिका प्रशासनाने हटवले बॅनर्स

Maratha Aarkshan News: जरांगे पाटील यांच्या परळी येथे होणाऱ्या महासंवाद बैठकीच्या आयोजकांना, याअगोदरचं पोलीस प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यांनतर आता परळी न.प.प्रशासनाने या कार्यक्रमाचे शहरात लावलेले बॅनर हटवण्याचे काम सुरू केले आहे.

विनोद जिरे

Beed News:

मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील यांची 20 मार्च रोजी बीडच्या परळी वैजनाथ येथे महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असून आयोजकांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता प्रशासनाकडून जरांगेंच्या बैठकीचे बॅनर्सही हटवण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज जरांगे पाटलांच्या बॅनर विरोधात आता परळी नगर पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्या परळी येथे होणाऱ्या महासंवाद बैठकीच्या आयोजकांना, याअगोदरचं पोलीस प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यांनतर आता परळी न.प.प्रशासनाने या कार्यक्रमाचे शहरात लावलेले बॅनर हटवण्याचे काम सुरू केले आहे.

20 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या या महासंवाद बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने बैठकीच्या 28 आयोजकांना परळी शहर पोलीसांनी कलम 149 सीआरपीसीप्रमाणे नोटीसा बजावल्या आहेत. तसेच आता या महासंवाद बैठकीच्या आयोजनाचे शहरभर लावलेले बॅनर प्रशासनाने काढून टाकायला सुरुवात केली आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान,  मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करत त्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने सभा घेतल्या. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिरूर पोलिसांनी (Police) गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती. परंतु ती परत आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT