बीड : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने बीड जिल्ह्यातील दहावीच्या (SSC Exam) अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. तर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नियमांमुळे केंद्रात प्रवेश (Beed News) मिळू शकला नाही. त्यामुळे तब्बल ९४३ विद्यार्थी पेपर देऊ शकले नाहीत. (Tajya Batmya)
दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी दहावीचा हिंदी विषयाच्या पेपर होता. हा पेपर जिल्ह्यातील ९४३ विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. सोशल मीडियावर एक वेळापत्रक परीक्षेच्या आधीपासून फिरत आहे. या वेळापत्रकात प्रथम सत्रात इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषेचा पेपर गुरुवारी (९ मार्च २०२३) रोजी दाखविण्यात आला आहे. या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला गेले नाहीत. विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार दहावीचा हिंदी (द्वितीय भाषा) विषयाचा पेपर बुधवार (८ मार्च) रोजी होता.
शिक्षकांनी फोन लावले अन्
सदरची बाब लक्षात आल्याने काही शाळांच्या (Social Media) शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना फोनद्वारे संपर्क करून दहावीच्या हिंदीचा पेपर ८ मार्चला असल्याचे व परीक्षार्थी परीक्षेला गेला का? याची खात्री केली. जे गेले नाही त्यांना परीक्षेसाठी ताबडतोब वेळेवर पोहोचण्याचे कळविले. हिंदीचा पेपर ९ मार्चला नसून तो ८ मार्च रोजीच असल्याचे समजल्यानंतर विद्यार्थी व पालकांची धावपळ झाली. शहरातील एका केंद्रावर विद्यार्थी परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने त्याला बोर्डाच्या नियमानुसार प्रवेश मिळू शकला नसल्याने रडू कोसळले. केवळ सोशल मीडियावरील वेळापत्रक आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र हिंदीचा पेपर बुडाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.