Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : बंडखोरी हा राजकारणाचा एक भाग; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

Beed News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा धडाडू लागल्या आहेत. अनेक मतदारसंघात मित्र पक्षातील उमेदवाराने केल्याने बंडखोरीचे आव्हान पक्षांसमोर आहे

विनोद जिरे

बीड : फक्त बीडमध्येच नाही तर राज्यात वेगवेगळ्या पक्षात बंडखोरी झाली आहे. बंडखोरी हा राजकारणाचा एक भाग आहे. ती बंडखोरी शमवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आष्टीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत. पक्षाच्या नेत्यांनी असा कसा निर्णय घेतला?; असे म्हणत आष्टीमध्ये मात्र मी कमळाचाच प्रचार करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा धडाडू लागल्या आहेत. अनेक मतदारसंघात मित्र पक्षातील उमेदवाराने केल्याने बंडखोरीचे आव्हान पक्षांसमोर आहे. त्यानुसार (Beed) बीडच्या आष्टी मतदारसंघात देखील महायुतीच्या मित्र पक्षातीलच दोन उमेदवार असून येथे बंडखोरी झाली आहे. याला याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलत होत्या. 

विधानसभा निवडणूक एकहाती पार करायची
बीड जिल्ह्यात काही अपक्ष उमेदवार पंकजा मुंडे यांचा फोटो आपल्या बॅनरवर वापरत आहेत. याबाबत विचारले असता कोणालाही उभं केलं नाही. परंतु काही कार्यकर्ते माझा फोटो वापरतात, ती त्यांची भावना आहे. तसेच लोकसभेत माझा एक हात मोडला. आता विधानसभा एक हाती पार करायची असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT