Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : एक कोटी लाचेची मागणी; फरार लाचखोर पोलीस निरीक्षक एसीबीला शरण

Beed News : बीड शहरातील माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती

विनोद जिरे

बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकाने तब्बल एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करत पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे स्वतःहून एसीबी समोर हजर झाले. यानंतर पोलिसांनी खाडे यास अटक केली आहे.

बीड (Beed) शहरातील माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील ५ लाख रुपये मध्यस्थी कुशल जैन याच्या मार्फत स्वीकारले होते. या दरम्यान एसीबीने कारवाई केली होती. या प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर हरिभाऊ खाडे फरार होता. त्याच्या घराची झडती घेतली असता १ कोटी रुपये रोख, साडेपाच किलो चांदी, ९० तोळे सोने, बारामती, इंदापूर, परळी, बीड येथील व्यापारी गाळे आणि फ्लॅट, सहन प्लॉटचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.

दरम्यान एसीबीकडून केलेल्या कारवाईनंतर खाडे फरार झाला होता. यांच्या शोधासाठी चार पोलीस (Beed Police) पथके तैनात करण्यात आली होती. मात्र रात्री उशिरा खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा लहानपणीचा फोटो पाहून म्हणाल, 'किती क्यूट'

Independence Day 2025 : १५ ऑगस्टसाठी पांढऱ्याऐवजी तिरंगा रंगाची साडी, पाहा हटके कलेक्शन

SRA Scheme: वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं, VIDEO

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली आदिवासी आंदोलकांची भेट

सलग ११ दिवस झोप घेतली नाही तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT