Beed Bribe Case : बीड एसीबीच्या एकाच दिवशी दोन कारवाया; कार्यकारी अभियंता ताब्यात, नगररचनाकार फरार

Beed News : बीड जिल्ह्याला लाचखोरीचे ग्रहण लागले की काय? असाच प्रश्न मागील काही दिवसांपासून होत असलेल्या कारवायांमुळे उपस्थित होत आहे
Beed Bribe Case
Beed Bribe Case Saam tv

बीड : बीड जिल्ह्याला लाचखोरीचे ग्रहण लागले की काय? असाच प्रश्न मागील काही दिवसांपासून होत असलेल्या कारवायांमुळे उपस्थित होत आहे. गेल्या आठवडाभरात जवळपास ८ जण लाचखोरीत अडकले आहेत. यात बीड एसीबीने एकाच दिवशी दोन कारवाई करत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व दुसऱ्या कारवाईत दोन खासगी व्यक्तींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. 

Beed Bribe Case
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक अपहाराचे ४० लाख रुपये वसूल; तासगाव शाखेत बँक कर्मचाऱ्यानेच मारला होता डल्ला

धरण, तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्याची परवानगी मिळावी यासाठी (Farmer) शेतकरी पाटबंधारे विभागात गेला होता. हि परवानगी देण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना (ACB) एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे. 

Beed Bribe Case
Water Crisis : घोटभर पाण्यासाठी संघर्ष; खडीमल गावात पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने टँकर हाच पर्याय

तर दुसऱ्या कारवाईत अकृषी पवानगीसाठी नगररचना कार्यालयात निलेश पवार व नेहाल शेख या खाजगी व्यक्तींना १५ हजारांची (Bribe) लाच घेताना एसीबीने अटक केली. तर ज्याच्यासाठी लाच घेत होते तो (Beed) लाचखोर नगररचनाकार प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९) हा मात्र फरार झाला आहे. दरम्यान एसीबीच्या या कारवायांनी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com