Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : लोकांची इच्छा असेल तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो; राष्ट्रवादी आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

"मतदार संघातील लोकांची इच्छा असेल तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो"

विनोद जिरे

Beed Political News : मतदार संघातील लोकांची इच्छा असेल तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजीमंत्री प्रकाश सोळुंके यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून प्रकाश सोळुंके राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर माजलगाव शहरात आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता, त्यानी पक्ष बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

भाजपच नाही तर मला‎ अनेक राजकीय पर्याय उपलब्ध‎ आहेत. भाजपमध्ये अगोदरच गर्दी‎ आहे. पुन्हा त्यात कशाला जाऊ‎, उलट शिंदे सेनेत सध्यातरी जिल्ह्यात‎ राजकीय मोठा पुढारी नाही. परंतु‎ माझा आणखी पक्ष सोडण्याचा‎ विचार नाही असं त्यानी बोलून दाखवलं.

राज्यात शिंदे -फडणवीस‎ सरकार सत्तेवर आल्यावर‎ माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ आमदार प्रकाश सोळंके हे‎ भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार‎ असल्याची चर्चा मागील दोन‎ महिन्यांपासून माजलगाव‎ मतदारसंघात सुरू आहे.

साेळंके‎ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ (Devendra Fadnavis) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या‎ भाजप नेत्यांबरोबर विविध‎ कामाबाबत चर्चा करतानाचे फोटो‎ झळकले आहेत. त्यामुळे मतदार‎ संघात सध्या सोळंके हे भाजपात‎ जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.‎

दरम्यान काल सायंकाळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत‎ आमदार प्रकाश सोळंके यांनी‎ माजलगाव येथील लोकनेते‎ सुंदरराव सोळंके महाविद्यालयात‎ पत्रकार‎ परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी‎ आमदार प्रकाश सोळंके यांना तुम्ही‎ भाजपात जाणार असल्याची चर्चा‎ मतदारसंघात असल्याची विचारणा‎ केली. तेव्हा आमदार सोळंके यांनी‎ या बाबत मला माहीत नाही.‎वेळ प्रसंगी मतदारांच्या इच्छेखातर‎ भाजपात जाण्याचा निर्णय घेवू‎ शकतो. अस सांगून खळबळ उडवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

VIDEO : ... तर आदित्यला बर्फाच्या लादीवर झोपवून मारा, रामदास कदमांचा पलटवार

Suryakumar Yadav: मानलं भावा तुला...खाली पडलेली इंडियाची कॅप पाहून सूर्याने असं काही केलं;Video पाहून कौतुकच कराल

Maharashtra News Live Updates: अश्लील हातवारे केल्याच्या आरोपावर पाशा पटेल यांची प्रतिक्रिया

Sri Lanka Government : श्रीलंकेत डाव्यांचे सरकार, अनुरा कुमार दिसानायकेने मारली बाजी, भारतासाठी किती चिंतेची बाब?

SCROLL FOR NEXT