Beed NCP News Saam tv
महाराष्ट्र

Beed NCP News : सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; युतीधर्म पाळत नसल्याचे आरोप, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

Beed News : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याबाबत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुरेश धस युतीधर्म पाळत नाहीत; त्या संदर्भात तक्रार करणार असल्याचे माजी आमदार संजय दौंड यांनी सांगितलय

विनोद जिरे

बीड : महायुती सरकार स्थापन झाले असताना बीडमध्ये मात्र महायुतीमध्ये फूट पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजप आमदार सुरेश धस हे युती धर्म पाळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला असून बीड राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे. या संदर्भात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी- माजी आमदार असं पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व माजी आमदार संजय दौंड यांनी दिली. 

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याबाबत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुरेश धस युतीधर्म पाळत नाहीत; त्या संदर्भात तक्रार करणार असल्याचे माजी आमदार संजय दौंड यांनी सांगितलय. बीडच्या अंबाजोगाई येथे राष्ट्रवादीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिष्टमंडळ जाणार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आपली भूमिका मांडताना सुरेश धस हे आपल्याच राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका करतात. अर्थात त्यांच्याकडून युती धर्म पाळला जात नाही. या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादीचे आजी- माजी आमदाराचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून धस यांच्याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले.  

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश नाही 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, कि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आता प्रत्येकाचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जाणार आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच २६ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची पुर्ण कार्यकारणी बरखास्त करणार असल्याचेही राजेश्वर चव्हाण यांनी सांगितले. त्याबरोबर ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा एकाला देखील पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही राजेश्वर चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Monsoon Tourism : पावसाळ्यात पर्यटकांसाठी स्वर्गीय अनुभव, विकेंड ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण

Lamborghini Fenomeno: मॉन्टेरी कार वीक २०२५मध्ये लॅम्बोर्गिनीने लाँच केली फेनोमेनो, जाणून घ्या संपूर्ण वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

Maharashtra Rain: रस्ते, दुकानं, शेत पाण्याखाली; सोलापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला, चादसैली घाटात कोसळली दरड

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

SCROLL FOR NEXT