Narayangad Lake Saam tv
महाराष्ट्र

Narayangad Lake : दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे संकट

Beed News : बीड जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड प्रकल्प मात्र यावर्षी पावसाच्या आती कमी प्रमाणामुळे तलावातील पाण्याने तळ गाठला आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने तलाव आणि धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातील दहा गावांची पाण्याची तहान भागविणाऱ्या नारायणगड तलावाने आतापासूनच तळ गाठला आहे. यामुळे तलावावरून पाणीपुरवठा होणाऱ्या दहाही गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प माजलगावचा प्रकल्प आणि नारायणगड प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला आहे. दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड प्रकल्प मात्र यावर्षी पावसाच्या आती कमी प्रमाणामुळे तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. बीड जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी संकट उभे राहिले आहे. 

पाण्यासाठी करावी लागणार भटकंती 

बीड तालुक्यातील पोंडुळ क्रमांक तीन येथील नारायणगड प्रकल्प आहे. या प्रकल्पाने पाण्याचा तळ गाठला असून दहा गावांची तहान भागवणारा हा प्रकल्प आहे. मात्र यावर्षी अति कमी पावसाच्या प्रमाणामुळे तलाव कोरडाठाक पडण्याचे चित्र समोर उभे राहिले आहे. आगामी काळात या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

प्रशासनासमोर मोठे आव्हान 

दरम्यान नारायणगड तलावावरून दहा गावांची तहान भागवली जाते. मात्र तलावातील पाण्याने तळ गाठल्यामुळे दहा गावांची तहान आता कशाच्या माध्यमातून भागवली जाणार हे प्रशासनापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. उन्हाची अतितीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचा अतिवापर टाळावा आणि पाणी जपून वापरावे. त्याचबरोबर छोट्या- मोठ्या तलावावरती शेतकऱ्यांकडून टाकण्यात येणाऱ्या मोटर काढून घेण्याचे प्रशासनाकडून सूचना करण्यात आले आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Maharashtra News Live Update: सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

SCROLL FOR NEXT