बीड : ग्रामपंचायतच्या विकास निधीचा गैरव्यवहार करण ग्रामसेवकाला चांगलंच भोवल आहे. बीडच्या नेकनुर ग्रामपंचायतचे (Grampanchayat) ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. (Beed) बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे. (Tajya Batmya)
बीड जिल्हा परिषदेअंतर्गत नेकनूर ग्रामपंचायतीसाठी विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. या ग्रामपंचायतीसाठी १५ व्या वित्त आयोगातून मंजूर कामात ग्रामसेवकाने गैरव्यवहार केला होता. यात पाणीपुरवठा योजनेवर तरतूद केलेल्या रकमेपेक्षा (Beed ZP) दीड लाख रुपये जास्तीचा खर्च दाखवून बील उचलणे, कोणतीही खरेदी न करता दोन लाख रुपये उचलण्याचा प्रकार केला होता.
सीईओंनी काढले आदेश
याशिवाय ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्याच्या आरक्षण सोडतीला उपस्थित न राहणे, या व इतर बाबींसाठी दोषी धरून ग्रामसेवक बालाजी बहिरवाळ यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबीत करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.