Manoj Jarange Patil slams Ajit Pawar on maratha aarakshan  Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: 'मराठ्यांच्या विरोधात बोलू नका; अन्यथा...' मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांना थेट इशारा

Manoj jarange Patil Vs Ajit Pawar: मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना शेवटचं सांगतो, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. असं म्हणत थेट अजित पवारांना इशारा दिला आहे.

विनोद जिरे

Manoj jarange Patil:

मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, मात्र दिलेलं आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट करून कसं चालेल ? असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना शेवटचं सांगतो, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. असं म्हणत थेट अजित पवारांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"अजित पवार (Ajit Pawar) यांना नोंदी सापडलेल्या माहित नाहीत का? ते महाराष्ट्रातच राहतात का? 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, असं मुख्यमंत्री साहेबांच्या मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्र्यांनी सांगितले. तसेच कायदा पारित करण्यासाठी आम्हाला नोंदी आवश्यक आहेत, त्या नोंदी सापडल्या आहेत.. असे गिरीश महाजन (Girish Mahajan) साहेबांनी सांगितल्याचे" जरांगे पाटील म्हणाले.

अजित पवारांवर निशाणा...

तसेच "कायद्याची चौकट तुम्हाला कळते ती वेगळी असते आणि करतात ते वेगळं असते. ही खरी चौकट आहे. यात मराठा आरक्षण बसतोय, विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काहीही भाष्य करून मराठा समाज आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला बोलायचे तर मराठ्यांच्या बाजूने बोला, अन्यथा आत्तापर्यंत तुम्ही जसे गप बसले तसं गप्प बसा, याच्यासाठीच तुम्ही गप्प बसला होतात का?" असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटलांचा इशारा..

"मराठ्यांना तुमच्या विरोधात बोलायला लावू नका, तुम्हाला हे शेवटचं सांगणं आहे. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे, कोणीही आडवं या....असा थेट इशारा जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT