Satish bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : सतीश भोसले महाराष्ट्राचा नवा विरप्पन, खोक्यानं शिकार केलेलं हरीण धसांच्या ताटात

Satish Bhosale : बीडचा खोक्या तर महाराष्ट्राचा विरप्पन निघाला. असं आम्ही का म्हणतोय? खोक्याच्या घरी पोलिसांना नेमकं काय मिळालं? आणि खोक्या नेमका कुठं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Yash Shirke

Beed Crime News : खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये ही जीवघेणी हत्त्यार जरा नीट निरखून पहा, हीच ती हत्यारं जी वन्यप्राण्यावर सपासप चालवून त्यांना संपवत होती. याच हत्यारानी अनेक निष्पाप मुक्याप्राण्यांना संपवलं. ही तीच हत्यारं आहेत ज्यांनी बीडच्या शिरुर मधील खोक्याच्या सफेद कॉलरचा बुरखा फाडून त्याचा पर्दाफाश केलाय. होय. ही दृष्य आहेत भाजपच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरातील. यात वन्यप्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघुर आणि बरच काही आढळलंय. नेमकी ही कारवाई कोणी केली आणि त्याच्या घरात काय सापडलं पाहुयात..

सतीश भोसलेच्या घरी काय सापडलं?

- सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी 40 वनाधिकाऱ्यांची धाड

- छाप्यात 3 कोयते, पिंजरे सापडले

- मोर पकडण्याचं जाळं छाप्यात सापडलं

- हरीण पकडण्याचा फास वनविभागाला सापडला

- लोखंडी प्लेट्स, सुकं मांस सापडलं

वनविभागानं केलेली ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय. कारण या कारवाईत एक दोन नव्हे तर चक्क 40 अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून हे साहित्य जप्त करत कारवाई केलीय. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे आतापर्यंत एय्याशीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले यामध्ये तो कधी मुलांना धमकावतांना, पैसे उधळतांना आणि तर कधी बॅटनं मारहाण करतांना दिसतोय.

पण आता वनविभागानं केलेल्या कारवाईत हा खोक्या भोसले शिकारीकरुन वन्यप्राण्याची मासांची तस्करी करत असल्याचा संशय बळावतोय. कारण केवळ हरीण, काळवीट, सश्यांसोबत तो मोरांची देखिल शिकार करत होता. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाईचा फास आवळला जातोय. तशी माहिती वनमंत्र्यांनी दिलीये. खोक्याच्या शिकारीचे मांस हे सुरेश धसांच्या ताटात जातं असं म्हणत सुरेश धसांवर देखिल आरोप करण्यात येतायेत.

सरपंच हत्या प्रकरणावरुन बीडमधील गँगवॉर आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्थाचं दर्शन राज्याला झालं. त्यामुळे आणखीनं किती वाल्मिक कराड आणि खोक्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवत अजून मोकाट फिरतायेत यावर गृहविभागानं आत्मचिंतन करायला हवं. राष्ट्रीय पक्षाची शिकार करणारा खोक्या हा राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे या खोक्याचं पॅकिंग करुन त्याची रवानगी तुरुंगात कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

SCROLL FOR NEXT