Karuna Munde Attacks Pankaja and Dhananjay Gopinath Saam
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? करूणा मुंडेंच्या दाव्यानं राजकीय वादळ उठलं

Karuna Munde Accuses Dhananjay of Destroying Her Respect: "गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा कोणाच्याच हाती नाही", करुणा मुंडे यांचा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर थेट आरोप.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण? यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी मेळाव्यात धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं होतं. यावर करूणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत', असं करूणा मुंडे म्हणाल्या.

'ना भाऊ ना बहीण.. आता फक्त करूणा वहिनी', असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुढील वारसा चालवू शकत नाही, असं म्हटलं आहे. यावेळी करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेचे बाणही सोडले आहेत. 'मला रस्त्यावर आणण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आहे. माझ्या कुंकवाची अब्रू धनंजय मुंडे यांच्यामुळेच घराबाहेर पडली आहे', असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

'धनंजय मुंडे यांनी माझ्या कुंकवाची अब्रू रस्त्यावर आणली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर मला संघर्ष करावा लागला नसता. मी आज इथे दिसले नसते', असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालू शकत नाहीत असे करूणा मुंडे यांनी म्हटले आहे.

छगन भूजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार धनंजय मुंडे असल्याचं मत मांडलं होतं. यावर मनसेचे माजी प्रवक्ते यांनीही भूमिका मांडली. त्यांनी नुकतीच एक पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. 'गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत', असं महाजन म्हणाले. यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसावरून सुरू असलेल्या हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

SCROLL FOR NEXT