Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : पत्नीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने बीड हादरलं

या धक्कादायक घटनेने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता राज्यातील बीड येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

घरातील कामे का केली नाही, असे म्हणत संतापलेल्या पतीने पत्नीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यातील नवाबवाडी येथे उघडकीस आली आहे. रेखा गोविंद घुले असं विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या बर्दापूर पोलीस (Police) ठाण्यात आरोपी पती गोविंद बाबासाहेब घुले आणि अमृत लिंबाजी घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहिता रेखा घुले यांच्या फिर्यादीवरून, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान पती गोविंद आणि अन्य एकजण घरी आला. यावेळी घरात सर्वत्र अस्ताव्यस्त पसारा पडलेला होता. यावर पतीने कामे केली नाहीस का? असे पत्नीला विचारले. यावर रेखा यांनी मुलगी रडत होती, मदतीला कोणीही नव्हते त्यामुळे कामे राहिले, असे सांगितले. (Beed Crime News)

मात्र गोविंदने कशाचाही विचार न करता घरातील विषारी औषधचा डब्बा उचलत तू मर, मला तुझी गरज नाही असे म्हणत हे विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी अमृतने रेखा यांचे हात, पाय धरले होते. सुदैवाने पोटात विषारी औषध न गेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

iPhone Tips: आयफोन स्मार्टपणे वापरयचा आहे का? मग 'या' ५ गुप्त सेटिंग्ज जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

IND vs AUS : कुलदीप-हर्षितचा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूही संघाबाहेर, पाहा प्लेईंग ११

नवी मुंबईत सुसाट प्रवास, मुंबई-पुणे महामार्ग फक्त १० मिनिटांत; २,९०० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील, कसा असेल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे?

SCROLL FOR NEXT