Ashti Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Ashti Vidhan Sabha : फसवलं गेल्याने बंडखोरी करत उमेदवारी; माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी साधला निशाणा VIDEO

Beed News : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. यात आज बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात साहेबराव दरेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल

विनोद जिरे

बीड : जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाने मला फसवलं म्हणून मी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरत असल्याचे मत बीडच्या आष्टी मतदारसंघात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम करूनही निष्ठावंतांना टाळलं जात असल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. यात आज बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात साहेबराव दरेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षातील नेते व पक्षावर निशाणा साधला आहे.  

जयंत पाटील (Jayant Patil) आणि बजरंग सोनवणे यांनी मला उमेदवारी देऊ असं शेवटपर्यंत आश्वासन दिलं. तुम्ही आष्टीला जा असं म्हणाले. मात्र आता दोन दिवसापूर्वी त्यांनी तिकीट दुसऱ्याला जाहीर केलं. शेवटपर्यंत त्यांनी तिकीट देतो, म्हणून मला फसवलं. यामुळे आता कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून आता मी जिंकण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे दरेकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सह पाऊस

EPF मध्ये नॉमिनी बदलायचा कसा? सोप्या स्टेप्सनं घ्या समजून

Nagpur Crime: नागपूर हादरले! पैशाच्या वाटणीवरून वाद, कुख्यात गुंडाची गळा चिरून हत्या

देव तारी त्याला कोण मारी! १० महिन्यांच्या चिमुरड्यासह १८ प्रवाशांना जीवदान कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर बस उलटली

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे मिळाले? घरबसल्या काही मिनिटांत करा तपास

SCROLL FOR NEXT