Tomato Price Saam tv
महाराष्ट्र

Tomato Price : २०० किलो टोमॅटोचा लाल चिखल; दर मिळत नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन

Beed News : शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याचे नेहमीच पाहण्यास मिळत असते. सध्या भाजीपाल्याचे दर देखील खाली आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: एकवेळ टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. मात्र सद्यस्थितीला बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अर्थात टोमॅटोची लाली फिकी पडली असल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यानुसार विक्रीसाठी आणलेला टोमॅटो शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकत त्यावर चालून लाल चिखल करत आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याचे नेहमीच पाहण्यास मिळत असते. सध्या भाजीपाल्याचे दर देखील खाली आल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यातच मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये प्रति किलो इतकाच दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल चिखल 

दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २०० किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एपीएमसी मार्केटमध्ये लिंबाचे दर वधारले

उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने एपीएमसी बाजारपेठेत लिंबाचा भाव वधारला आहे. लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत असली तरी दर मात्र वाढत चालले आहेत. उन्हाळ्यात लिंबाचा रस आणि लिंबाचे लोणचे यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात लिंबू खरेदी करत असतात. ग्राहकांची मागणी वाढल्याने लिंबाचा भाव चढला. एपीएपसी मार्केटमध्ये १०० नग लिंबू ५०० ते ६०० रुपयांना विकले जात असून एक लिंबू तब्बल १० रुपयांना विकला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT