Malegaon : बोगस कर्मचारी भरती प्रकरण; मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्था संचालकांवर गुन्हा दाखल

Nashik News : नागपुरातील बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकाला पदाला मान्यता देण्यासंदर्भातील घोटाळा गाजत आहे. यानंतर मालेगाव मधील शिक्षण संस्थेत बोगस कर्मचारी भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आले
Malegaon
MalegaonSaam tv
Published On

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: नाशिकच्या मालेगाव शहरातील सर्वात जुन्या महात्मा फुले शिक्षण संस्थेतील या. ना. जाधव विद्यालयात बोगस कर्मचारी भरती झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तथाकथित संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या मतदार संघात हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

नागपुरातील बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकाला पदाला मान्यता देण्यासंदर्भातील घोटाळा शिक्षण विभागात सध्या गाजत आहे. यानंतर मालेगाव मधील जुन्या असलेल्या शिक्षण संस्थेत बोगस कर्मचारी भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे शिक्षण विभागात सुरु असलेल्या गोंधळ समोर आला आहे. मालेगावमधील शिक्षण संस्था संचालकांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Malegaon
Tuljabhavani Devi : तुळजाभवानी मातेच्या चरणी भरभरून दान; भाविकांकडून वर्षभरात १७ किलो सोनं, २५६ किलो चांदी अर्पण

आरक्षित जागेवर बेकायदेशीर नियुक्ती 

मालेगावमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या या. ना. जाधव विद्यालयात बोगस कर्मचारी भरती झाली आहे. या संस्थेतर्फे २०१२ साली संस्थेत नियुक्तीच्या जाहीरात काढण्यात आली होती. मात्र पात्रता नसताना व आरक्षण असणाऱ्या जागेवर कनिष्ठ लिपिक पदावर सन २०२१ साली संदीप विश्वनाथ जाधव यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आली होती. या विरोधात माहिती अधिका-याच्या खाली शेखर अशोक पाटील यांनी मालेगावच्या न्यायालयात धाव घेतली होती. 

Malegaon
Wada Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी बोरिंगवर रात्रभर जागरण; भीषण पाणीटंचाईने महिला त्रस्त

यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

दरम्यान बोगस कर्मचारी भरती प्रकरणी मालेगाव न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संस्थेचे तथाकथिक अध्यक्ष सुनील माधवराव वडगे, संस्थेचे सेक्रेटरी ऍड. जिभाऊ अहिरे, तत्कालीन मुख्याध्यापक नंदलाल भिमाजी ताजने व कनिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ जाधव या चौघांवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com