Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : मंत्र्यांना गावबंदी करून शेतकऱ्यांचा हिसका दाखविणार; बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संतप्त भावना

Beed News : तात्काळ मदत जाहीर करा पाच हजार रुपयांमध्ये आमचं काहीही होत नाही विष प्यायची वेळ आली आहे. कधी मदत करणार नुसत्या घोषणा करता, मात्र तुम्हाला मदत करता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा शेतकऱ्यांनी दिला

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची आस आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर येताना मदत घेऊनच या; अन्यथा मंत्र्यांना गाव बंदी करून येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा हिसका दाखवू; अशा संतप्त भावना बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे आता शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून यामध्ये फळबागांचेही नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून ती मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही; असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्यांना मदतीची आस आहे. 

बांधावर यायचे असेल तर मदत घेऊनच या 

मंत्री, आमदार, खासदार बांधावर येतात फोटोसेशन करतात आणि निघून जातात. मात्र आता तुम्हाला बांधावर यायचे असेल तर मदत घेऊनच यावं. नाहीतर तुम्हाला गाव बंदी करू, शेतकऱ्याचा हिसका दाखवू; अशी भावना आता शेतकरी व्यक्त करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला शेतकरी काय आहे ते दाखवून देऊ; असाही इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.  

दुष्काळ जाहीर करा अन्यथा शेतकऱ्यांचा हिसका दाखवू 

नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्हाला यायचं असेल, तर मदत घेऊनच या. नाहीतर चालते व्हा. मंत्री आणि लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांकडून गावबंदी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा नसता शेतकऱ्यांचा हिसका दाखवू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला गाव बंदी करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एअर इंडियाच्या विमानामध्ये बिघाड, दिल्लीला जाणारं विमान पुण्यातच थांबलं

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी रात्री झोपताना लावा कोरफड आणि गुलाबपाणी, पाच दिवसात दिसेल फरक

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात वादग्रस्त स्टेटस अन् मोठा जमाव जमला; नेमकं काय घडलं? VIDEO

Fact Check : केंद्र सरकारची बेरोजगारी भत्ता योजना! तरुणांना दरमहा २,५०० रुपये मिळणार, काय आहे सत्य?

World Highest Bridge : दोन तासांचा प्रवास ५ मिनिटांत होणार; जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला, VIDEO

SCROLL FOR NEXT