Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : विद्युत तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराने गेला बळी

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तार निपाणी टाकळी येथून गेली आहे.

विनोद जिरे

बीड : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. (Beed) बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या निपाणी टाकळी गावात विद्युत वाहक तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा (Farmer) होरपळून मृत्यू झाला. बालासाहेब वैजनाथ पांडे असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तार निपाणी टाकळी येथून गेली आहे. धोकेदायक असलेल्या या तारेबाबत गावकऱ्यांनी महावितरणकडे (Mahavitaran) तक्रार केली होती. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्याला नाहक जीव गमवावा लागला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतातून परतताना घडली घटना 

गावातील रहिवाशी मयत बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ५५) हे त्यांच्या शेतातून काम आटोपून घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमीजवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तार अंगावर पडली. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT