Majalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon News : खोटे दस्तावेज तयार करून ५३ गुंठे प्लॉट हडपला; माजलगावच्या माजी नगराध्यक्षांवर शेतकऱ्यांचा आरोप

Beed Majalgaon News : जमिनीसंदर्भात मागासवर्ग आयोगाने मागितलेला अहवाल पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने पाठवला असून आरोपींना पोलीस वाचवायचं काम करत असल्याचा आरोप उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : फुले पिंपळगाव येथील गट क्रमांक २० मधील ५३ गुंठे प्लॉट माजलगावचे माजी नगराध्यक्ष यांनी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस व खोटे दस्तावत तयार करून हा प्रकार करण्यात आला असून या विरोधात फुले पिंपळगाव येथील पीडित शेतकऱ्यांचं पोलीस अधीक्षक कार्यालय समोर उपोषण सुरू केले असून या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी माजलगाव हद्दीतील फुले पिंपळगाव येथील गट क्रमांक २० मधील तब्बल ५३ गुंठे प्लॉट खोटे दस्तऐवज तयार करून हडपल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र तयार करून आणि पदाचा गैरवापर करत हा संपूर्ण प्रकार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. याबाबत अनेकदा चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. 

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 

दरम्यान या विरोधात शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले असून त्यांनी असे म्हटले आहे की आमच्या मालकी हक्काची जमीन असताना गायरान धारक जमीन असताना देखील खोटे कागदपत्रे तयार केले. तसेच नगराध्यक्षपदाचा गैरवापर करत हे संपूर्ण दस्ताऐवज तयार केले आहेत. अधिकाऱ्यांना हाताखाली धरून हा संपूर्ण प्रकार केल्याचा आरोप उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे. या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

पोलिसांनी चुकीचा आरोप केल्याचा आरोप 

दरम्यान याप्रकरणी मागासवर्ग आयोगामध्ये तक्रार केली होती. मागासवर्ग आयोगाने या संदर्भात पोलिसांना आदेशित केले होते की या प्रकरणात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा व संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करावी. मात्र पोलिसांनी चुकीच्या पद्धतीचा अहवाल तयार करून आरोपीला वाचविण्याचे काम केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. फुले पिंपळगाव येथील शेतकरी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकचे रस्ते खड्ड्यात, सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण

SBI Recruitment: स्टेट बँकेत सरकारी नोकरीची संधी, ५१८० पदांसाठी भरती जाहीर; आजच अर्ज करा

High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

Emergency Car Tips: वाटेत गाडी बिघडल्यास काय कराल? 'या' सोप्या टिप्सने करा आणि सुरक्षित राहा

Shweta Tripathi : बॉलिवूड अभिनेत्रीनं चेंबूरमध्ये घेतलं घर, किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT