ED CBI Raid At Beed Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

ED-CBI Raid At Beed Sugar Factory: शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी, सीबीआयचे छापे; कोट्यवधी रूपयांचा गैरव्‍यवहार

शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी, सीबीआयचे छापे; कोट्यावधी रूपयांचा गैरव्‍यवहार

विनोद जिरे

बीड : बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच (ED) ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार (Beed News) झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. (Tajya Batmya)

धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी २०१० साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची (Sugar Factory) उभारणी करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक एमओयु साइन केला. त्यानंतर काही काळ उलटला आणि नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हा कारखाना स्वतःच्या नावे करून पांडुरंग सोळुंके यांना बाजूला केले. २०१३ साली याच साखर कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी १०६ कोटी रुपयांचे कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून घेतले आहे.

बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोरीत काढला. हे प्रकरण कोर्टात गेले. मात्र या कारखान्याचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आले; त्या बँकांनी हा कारखाना लिलावात काढला आहे. मात्र हा कारखाना लिलावात काढल्यानंतर आता यामध्ये ईडी आणि सीबीआय यांच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे. आता यामध्ये नेमकी सोळंके की तासगावकर यापैकी कोणाची चौकशी होत आहे का? हे ईडी आणि सीबीआय च्या छाप्यानंतरचं उघड होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT