
अभिजीत देशमुख
कल्याण : राज्यात शिवसेना– भाजप युती असली तरी शिवसेना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस असल्याचे कल्याणमधील एका कार्यक्रमानिमित्त दिसून आले. पालिकेच्या कार्यक्रमात (BJP) भाजपच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे (Kalyan) कमळ चिन्ह लावल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांजवळ हरकत घेत पक्षाचे चिन्ह काढण्याची मागणी केली. यावेळी बाचाबाची देखील झाली. (Live Marathi News)
राज्यात शिंदे– फडणवीस सरकार आहे. शिवसेना– भाजपची युती आहे. राज्यात सर्व अलबेल दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. २९ मार्चला सकाळच्या सुमारास कल्याण– डोंबिवली महापालिकेच्या आंबिवली वडवली परिसरातील प्रभाग कार्यालयात महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आलं होते. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होते. भाजपच्या महिला पदाधिकारी मनीषा केळकर या आपल्या महिला कार्यकर्त्यांसह या कार्यक्रमास उपस्थित होत्या. तसेच (Shiv Sena) शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील हेदेखील कार्यकर्त्यांसह या कार्यक्रमासाठी आले होते.
चिन्ह काढण्यावरून वाद
मनीषा केळकर व त्यांचे कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हे चिन्ह लावले होते. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक पाटील यांनी प्रभाग अधिकार्यांना हा महापालिकेचा कार्यक्रम आहे की राजकीय पक्षाचा? असा प्रश्न विचारला. तसेच महापालिकेच्या कार्यक्रमात राजकीय चिन्ह नको अन्यथा आम्ही पण शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह लावू असे सांगितले. प्रभाग अधिकारी यांनी मनीषा केळकर यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष चिन्ह काढल्यास लावले.
पोलिसात तक्रार
याबाबत मनीषा केळकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दुर्योधन पाटील यांनी दादागिरी करत अपमान केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. दुर्योधन पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तर याबाबत दुर्योधन पाटील यांनीहा महापालिकेचा कार्यक्रम होता. कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लावलेले भाजप पक्षाचे चिन्ह काढायला प्रभाग अधिकाऱ्यांना सांगितले. मी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत, तुम्ही व्हिडियो पाहु शकता, माझी बदनामी करण्याचा प्रकार आहे असे स्पष्ट केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.