बीड - मंत्री नसल्याचा सर्वात जास्त आनंद कुणाला होतोय तर धनंजय मुंडे म्हणून तो आज मला होत आहे. असं वक्तव्य माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने परळी येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री झालं की मिटिंग घ्यावा लागायच्या व्यस्त असायचो, मंत्री झालं की जमिनीवरून फूटभर वरी चालायचो असंही ते म्हणाले आहेत.
हे देखील पाहा -
महाराष्ट्राच्या राजकारणात परळी वैजीनाथ या मतदारसंघाचे नाव एवढं मोठं आहे, की कुठलीही राजकीय घडामोडीमध्ये या परळी वैद्यनाथाला विचारल्याशिवाय राज्यातील कुठलीही राजकीय घडामोडी घडत नाही. एवढी आपली ताकद आहे. सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडणार नाही.
या अगोदर पाच वर्षे आपण सत्तेत नव्हतो, इथले लोक प्रतिनिधी राज्य आणि केंद्रात सत्तेत होते. तरी सुद्धा आपला निधी थांबवू शकले नाहीत. परळीत येणारा निधी कोणी अडवू शकलं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं उपमुख्यमंत्री कोण होतं आणि मंत्री कोण होतात. याच्याशी आपल्याला घेणंदेणं नाही. आपला विकासाचा पैसा कोणीही थांबवू शकणार नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपाने नेत्या पंकजा मुंडेंना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.