Dhanajay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhanajay Munde Statement : काँग्रेसचा विरोध मोदींना की टिळकांच्या नावाला?; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा सवाल

विनोद जिरे

बीड : ज्या टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या टिळकांच्या नावाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जात असताना काँग्रेसने टीका करणे चुकीचे आहे. काँग्रेसला (Congress) मोदींना विरोध करायचा आहे की टिळकांना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत (Dhanajay Munde) असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. (Maharashtra News)

बीडमध्ये माँसाहेब जिजाऊ पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक झाली. याच ठेवीदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यादरम्यान मुंडे माध्यमांशी बोलत होते. राज्यात सध्या शेतकरी (Farmer) पिक विमा भरत असून महायुतीच्या शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना जाहीर केल्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही पिक विमा भरता येत नव्हता, त्यांच्या पिकांनाही आता यावर्षी संरक्षण मिळू शकणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. राज्यात जून, जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असला तरी काही भागात पावसाची सरासरी कमी आहे. आता ऑगस्टमध्येही मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. अशा स्थितीत फळबागांचे होणाऱ्या नुकसानीवर काय उपाययोजना करता येतील, यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

विमा भरला नसेल तर लाभ नाही 
ज्या गायरान जमिनीवर विमा (Crop Insurance) भरलेला आहे, त्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही, असं म्हणत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गायरान जमिनीवरती लोकांनी विमा भरल्याचं समोर आल्यानंतर त्याला उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्दात जरी कुणी असा खोडसाळपणे विमा भरला असेल तरी लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगितलय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT